संदेश

मराठी कवितेतील राष्ट्रनिष्ठा - डॉ. रवींद्र बेम्बरे

चित्र
मराठी कवितेतील राष्ट्रनिष्ठा                         भारत मातेच्या मुक्तीसाठी आपल्या सर्वस्वाची आहुती दिलेल्या असंख्य स्वातंत्र्यवीरांची आढळ राष्ट्रनिष्ठा मराठी कवितेतून तितक्याच उत्कटतेने प्रकटली आहे. भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे नितळ प्रतिबिंब जसे मराठी कवितेतून उमटले, तसेच स्वातंत्र्य आंदोलनास गती देण्याच्या दृष्टीनेही ती पूरक ठरली. पारतंत्र्याच्या काळात स्वातंत्र्यलढ्यासाठी एक पोषक मनोभूमिका तयार करण्यात मराठी कवितेचे योगदान मौलिक स्वरूपाचे आहे.  आधुनिक मराठी काव्यपरंपरेतील एक महत्त्वाचा प्रवाह म्हणून राष्ट्रीय कवितेकडे पाहिले जाते. भारतीय स्वातंत्र्य चळवळी बरोबरच राष्ट्रीय कवितेचा हा प्रवाह उत्क्रांत होत गेला. स्वातंत्र्यवीरांची जाज्वल्य राष्ट्रनिष्ठा, ध्येयनिष्ठा, राष्ट्राप्रतीची बांधिलकी, त्याग, समर्पणभाव या बाबी राष्ट्रीय कवितेतून सहजगत्या साकारलेल्या आहेत. वारकरी संत कवितेत जशी उत्कट विठ्ठलभक्ती आहे, तशी राष्ट्रीय कवितेत राष्ट्रभक्ती आहे. राष्ट्रीय विचाराने भारलेल्या देशसेवकांच्या भावविश्वाचे दर्शन राष्ट्रीय कव...

संसदीय लोकशाही मूल्यांचा उद्गाता : महात्मा बसवेश्वर

चित्र
           जगाच्या इतिहासात प्लेटो आणि बुद्धांचा अपवाद सोडला, तर लोकशाही मूल्यांचा व्यापक विचार करून ती मूल्य आचरणात आणणारी पहिली व्यक्ती म्हणजे महात्मा बसवेश्वर. ज्या काळात अमेरिका हा देश अस्तित्वात नव्हता. इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, चीन रशिया या देशातूनही राजेशाहीचा उद्घोष होत होता. तेव्हा महात्मा बसवेश्वरांनी येथे लोकशाही मूल्य रूजवण्याच्या दृष्टीने आपली वाटचाल केली. या जगातील माणसाला केंद्रस्थानी ठेवून स्वांतत्र्य, समता, बंधुता, सामाजिक न्याय, सहिष्णुता, सत्य, अहिंसा या लोकशाही मूल्यांची मांडणी केली. या मूल्यांच्या प्रतिष्ठापनेसाठी रचनात्मक अशी कल्याणक्रांती केली. राजेशाहीच्या काळात कुणाच्या ध्यानी मनीही संसदेची कल्पना नव्हती, तेव्हा महात्मा बसवेश्वरांनी लोकशाही मूल्याचे अधिष्ठान देऊन अनुभव मंटपाची उभारणी केली. त्यांचे हे अनुभव मंटप म्हणजे प्रगल्भ संसदीय लोकशाहीचा या जगातला पहिला आविष्कार होता. बौद्ध धर्माचा अपवाद सोडला तर जगातील बहुतांश धर्म, पंथ कुठल्यातरी प्रेषित वा अवतारी पुरुषाने मांडलेल्या विचारातूनच आकाराला आली. या धर्माच्या जडणघडणी पासून सामान्य ...

भारतीय संतांच्या भूमिकेतून वर्तमान अर्थचक्र

चित्र
      कोरोना विषाणूने संपूर्ण जगाची झोप उडवली. सत्ता, संपत्ती, सामर्थ्य, पद, प्रतिष्ठा,कीर्ती या गोष्टी आज अर्थहीन ठरल्या. राजा पासून रंकापर्यंत सर्वांना जमिनीवर आणणारे हे संकट ठरले. अत्यावश्यक सेवांचा अपवाद सोडला तर संपूर्ण जग बंदिस्त करणारे हे संकट सर्वार्थाने अपूर्व आणि अविस्मरणीय आहे. वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी प्राणपणाने कोरोना विषाणू विरुद्ध लढत आहेत. ज्यांचे हातावर पोट आहेत, ते सर्व हवालदिल आहेत. उद्याच्या चिंतेने अनेकांची झोप उडाली. जगाचे सर्व प्रस्थापित अर्थिक समीकरणे मोडीत निघाली. कोरोना महामारीने बहुतांश देशाचा आर्थिक कणाच मोडला. यातून एक सार्वत्रिक हतबलता आली. शारीरिक आरोग्या प्रमाणेच आर्थिक आरोग्य सुधारण्याचे मोठे आव्हान आज अर्थशास्त्रज्ञा समोर आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार  कोरोना महामारीचे  विक्राळ रूप अजून  पुढेच आहे. यामुळे उद्याची आर्थिक स्थिती कशी असेल याबद्दल अंदाज करणे देखील कठीण झाले आहे. अर्थतज्ञाकडून आज केवळ शक्यता वर्तवल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर चिरंतन भारतीय संत साहित्यातून कोणता संदेश मिळतो याचा शोध घेण्याच्य...

वारकरी संतकवयित्रीचे काव्यधन

चित्र
                          जगाला समता आणि समन्वयशिलतेचा संदेश देण्यासाठी संत ज्ञानेश्वर नामदेवादी संतांनी तेराव्या शतकात वारकरी संप्रदायाची बांधणी केली. 'यारे यारे लहानथोर । भलते याती नारी नर।।' असा उद्घोष करीत सर्व भेदभावाच्या पलीकडे जाऊन माणूस जोडला. यामुळे विटाळाच्या नावाखाली पिढ्यानपिढ्यापासून सर्वदृष्टीने वंचित आणि उपेक्षित राहिलेल्या स्त्रीला परमार्थाचा अधिकार मिळाला. यामुळे वारकरी संप्रदायात संतकवयित्री मुक्ताबाई, जनाबाई, सोयराबाई, निर्मळा, कान्होपात्रा, बहिणाबाई अशा संतकवयित्रीची एक समृद्ध परंपरा निर्माण झाली. आपली अध्यात्मिक अनुभूती आणि विचारांची अभिव्यक्ती यांनी अभंग छंदातून केली. स्त्रीसुलभ भावनांच्या उत्कट अभिव्यक्तीतून त्यांच्या अभंगवाणीला भावकवितेचे सौंदर्य प्राप्त झाले. त्याचप्रमाणे त्यातून प्रकट झालेल्या विचारातून वैचारिक उंचीचे दर्शन घडते.          ज्ञानेश्वरादी भावंडात सर्वात लहान असूनही उच्च कोटीच्या प्रगल्भतेचा आदर्श मुक्ताबाईंनी जगासमोर प्रस्थापित केला. मुक्ताबाईचे त्रेसष्ठ अभंग...

वर्तमान नैसर्गिक आपत्तीत भारतीय संतांचे उदगार

चित्र
                                                      वर्तमान   नैसर्गिक आपत्ती त भारतीय संतांचे उदगार                 भारतीय संत साहित्य म्हणजे शाश्वत सत्याचा एक व्रतस्थपणे घेतलेला शोध आहे .   ते कालनिरपेक्ष असल्यामुळे कोणत्याही विशिष्ट संकटाचे संदर्भ त्यात सा पडत नाहीत. काही संतांनी ढोबळ मानाने संकटाचे तीन प्रकार सांगितले आहेत .   दैविक संकट , दैहिक संकट आणि   भौतिक संकट असे ते तीन प्रकार आहेत . आज आपल्या समोर उभे असलेले को रोना महामारीचे संकट देहावरचे असल्यामुळे ते दैहिक संकट ठरते . भूकंप , महापूर , वादळ , अतिवृष्टी , अनावृष्टी अशा नैसर्गिक आपत्तींचा समावेश भौतिक संकटात होतो . मानवाच्या उत्पत्तीपासून संकट हे त्याच्या जीवनाचे अविभाज्य अंग राहिले आहे. म्हणून आज आपल्यासमोर आलेले करोना महामारीचे संकट पहि ले आणि शेवट चे नाही. अशी ...