संदेश

अगस्त, 2022 की पोस्ट दिखाई जा रही हैं

मराठी कवितेतील राष्ट्रनिष्ठा - डॉ. रवींद्र बेम्बरे

चित्र
मराठी कवितेतील राष्ट्रनिष्ठा                         भारत मातेच्या मुक्तीसाठी आपल्या सर्वस्वाची आहुती दिलेल्या असंख्य स्वातंत्र्यवीरांची आढळ राष्ट्रनिष्ठा मराठी कवितेतून तितक्याच उत्कटतेने प्रकटली आहे. भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे नितळ प्रतिबिंब जसे मराठी कवितेतून उमटले, तसेच स्वातंत्र्य आंदोलनास गती देण्याच्या दृष्टीनेही ती पूरक ठरली. पारतंत्र्याच्या काळात स्वातंत्र्यलढ्यासाठी एक पोषक मनोभूमिका तयार करण्यात मराठी कवितेचे योगदान मौलिक स्वरूपाचे आहे.  आधुनिक मराठी काव्यपरंपरेतील एक महत्त्वाचा प्रवाह म्हणून राष्ट्रीय कवितेकडे पाहिले जाते. भारतीय स्वातंत्र्य चळवळी बरोबरच राष्ट्रीय कवितेचा हा प्रवाह उत्क्रांत होत गेला. स्वातंत्र्यवीरांची जाज्वल्य राष्ट्रनिष्ठा, ध्येयनिष्ठा, राष्ट्राप्रतीची बांधिलकी, त्याग, समर्पणभाव या बाबी राष्ट्रीय कवितेतून सहजगत्या साकारलेल्या आहेत. वारकरी संत कवितेत जशी उत्कट विठ्ठलभक्ती आहे, तशी राष्ट्रीय कवितेत राष्ट्रभक्ती आहे. राष्ट्रीय विचाराने भारलेल्या देशसेवकांच्या भावविश्वाचे दर्शन राष्ट्रीय कव...